फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये काल शुक्रवारी एका शिक्षकावर हल्लेखोराने चाकूने हल्ला करुन शिरच्छेद केल्याची घटना समोर आलीय. हल्लेखोराने ज्या शिक्षकाचे डोके कापले, त्या शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांना 'शार्ली हेब्दो'मध्ये प्रसिद्ध झालेले मोहम्मद पैगंबर यांचं व्यंगचित्र दाखवलं होतं, अशी माहिती मिळते आहे. हा दहशतवादी हल्ला असल्याचा निर्वाळा देत फ्रान्स सरकार याबाबत अधिक तपास करत आहे. या घटनेनंतर #parisbeheading म्हणजेच 'पॅरिसमधला शिरच्छेद' नावाचा हॅशटॅग ट्रेंडिंग आहे. मात्र, या घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा हा सवाल उभा राहिलाय की, लिहणाऱ्या लेखणीचं आणि त्यातून उमटणाऱ्या स्वतंत्र अशा अभिव्यक्तीचं सर्वच धर्मांना वावडं का आहे? धर्मांना सहिष्णुतेची इतकी अडचण का आहे? या विषयीच आपण आज बोलणार आहोत... आज काय विशेषमध्ये...
#parisbeheading #Paris #Relegion #FreedomOfExpression #Freedom #Tolerence
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years, Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Video by - Prajwal Katake